जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद  अंतर्गत खालील प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.

१) जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ 

२) निम्न दुधना प्रकल्प
३) नियोजित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२
१ प्रकल्पाची व्याप्ती:
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत १) सिंदफना नदीवरील ४५३.६४ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेचे माजलगांव धरण २) पैठण धरणापासून निघणारा १३२ किमी लांबीचा पैठण उजवा कालवा, ३) माजलगांव धरणापासून निघणारा १४८ किमी लांबीचा माजलगांव उजवा कालवा या कामांचा समावेश आहे.
२) प्रशासकीय मान्यता
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ च्या रुपये ७८.२५ कोटी रकमेस शासन पत्र क्रमांक पीआयएम/४९७२/४३०४३/आयपी/आय दिनांक २१/५/१९७४ अन्वये मूळ प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे रुपये ७९२.२० कोटी इतक्या रकमेच्या तृतीय सुधारित अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग शासन निर्णय क्र.जेएवाय-२००१/२३२/(१३२/२००१)मोप्र-२ दिनांक २८/६/२००१ नुसार मान्यता प्राप्त झाली आहे. 
३) कामाची सद्य:स्थिती 

३.१) पैठण उजवा कालवा : 

पैठण धरणापासून निघणारा १३२ किमी लांबीचा पैठण उजवा कालवा पूर्ण झाला असून पूढील सिंचन व्यवस्थापनेसाठी व्यवथापन यंत्रणेस हस्तांतर करण्यांत आला आहे. या कालव्याद्वारे मूळ संकल्पने प्रमाणे ४१,६८हेक्टर सिंचन क्षमता निर्मित उद्यिष्ट पूर्ण झालेले आहे. 
३.२ ) माजलगांव धरण: 
माजलगांव धरण पूर्ण झाले असून १९८६ पासून पाणी साठवण करणे सूरु आहे. 
३.२ ) माजलगांव उजवा कालवा : 
माजलगांव धरणापासून १४८ किमी.लांबीचा माजलगांव उजव्या कालव्याद्वारे ८४,८५हेक्टर सिंचन क्षमता निर्मित उद्यिष्ट आहे. सद्य:स्थितीत मुख्य कालव्याचे काम किमी १०१ पर्यंत पूर्ण झाले असून त्याची वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहे. कि.मी. १०१ पर्यंत ५४७३हे. पैकी ५४७२ हे. सिंचन निर्मितचे झाली आहे. उर्वरीत १२हे. क्षेत्रास गोदावरी नदीतून उपसा सिंचनाव्दारे सिंचन होत असल्यामूळे शेतक-यांचा काम करण्यास विरोध आहे. त्यामूळे हे क्षेत्र वगळण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यांत येईल. सद्यस्थितीत हस्तांतरणपूर्व कामे प्रगतिपथावर व निविदास्तरावर आहेत.
४) प्रकल्पाचा अंदाजित खर्च तसेच प्रकल्पावर झालेला अद्यावत खर्च
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ ची अंदाजीत किंमत रुपये ७९२.२० कोटी आहे या प्रकल्पावर मार्च २००७ पर्यन्त रु. ७०१.३१ कोटी खर्च झाला आहे. या प्रकल्पावर डिसेंबर २००७ पर्यंत २००७-२००८ या आर्थिक वर्षात रु. १५.१६ कोटी तर एकूण रु. ७१६.४७ कोटी खर्च झाला आहे. सन २००७-०८ या वर्षासाठी या प्रकल्पास रुपये १७.६४ कोटी अनुदान प्रस्तावित आहे.
५) वन जमीन 
या प्रकल्पांतर्गत वन जमीन येत नाही. 
६) भूसंपादन
या प्रकल्पांतर्गत भूसंपादनाची माजलगांव उजवा कालवा कि.मी. १०१ पर्यंतची सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. कि.मी. १०२ ते कि.मी. ११४ मधील भूसंपादनाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. 
७ पूनर्वसन 
या प्रकल्पांतर्गत पूनर्वसनाची कामे पूर्ण झालेली आहेत. 

ठळक वैशिष्ट्ये
जायकवाडी प्रकल्प टप्पा- २

१.

प्रकल्पाचे नांव 

जायकवाडी प्रकल्प टप्पा-२

    अ)पैठण उजवा कालवा
    ब) माजलगांव धरण.
    क) माजलगांव उजवा कालवा.
  तालुका माजलगांव.
  जिल्हा बीड.
२. धरणाची जागा माजलगांव (सिंदफणा नदीवर )
  अक्षवृत्त १६० १६' उ
  रेखावृत्त ७३० २६' पू
३. प्रशासकीय मान्यता:  
  अ) मूळ प्रशासकीय मान्यता रुपये ७८२५ लक्ष (१९७४)
  (शासनाचं पत्र क्र. पीआयएम/ ४९७२/ ४३०४३/ आयपी/ आय दिनांक २१/५/१९७४)
  आ) प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता रुपये २७२५१.४३ लक्ष
  (शासनाचे पत्र क्रं. जेएवाय/ १०८३/ ६१०/ (२३११)/एमएजे (३) दिनांक ११/३/१९८५ 
  इ) द्वितय सुधारीत प्रशासकीय मान्यता रुपये ५४३००लक्ष (१९९४/९५ )
  शासन पा.वि.निर्णय क्र.जेएवाय-१०९०/ ९१४२ (२७३/९०) मोप्र-२/ भाग-१ दि. १५/७/१९९९
  ई) तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता रुपये ७९२२०.३१ लक्ष (१९९९/२०००)
  शासन पावि. निर्णय.क्र. जेएवाय २००१/ २३२/ (१३२/२००१) मोप्र-२ दिनांक २८/६/२००१
  उ) प्रकल्पाला केंद्रीय योजना आयोगाची मान्यता मिळाल्याचे वर्ष. रुपये ८८९० लक्ष ( जुन-१९७६ )
  (भारत सरकार योजना आयोगाचे पत्र क्र. : II / १५ (१)(१४) / ७६ I & CAD Dt.  ०२/०६/१९७६)
४. प्रकल्प सुरु झाल्याचे वर्ष :  
  अ) माजलगांव धरण  १९७७.
  ब) कालवे   
  पैठण उजवा कालवा १९७१/७२
  माजलगांव उजवा कालवा १९७६
५. प्रकल्पावरील खर्च  
  ३/२००७ अखेर इ.टी.पी.सह रुपये ७०१३०.६७ लक्ष
६. बुडीत क्षेत्र. (एकूण ) बीड जिल्हा ७८१३(हेक्टेर)
  अ) सरकारी क्षेत्र.(गांवठाणासह) ३५५ (हेक्टेर)
  आ) वन जमीन. निरंक
  इ) खाजगी शेती. ७४५८ (हेक्टेर)
७. प्रकल्प बाधीत गांवे.बीड जिल्हा २० गांवे.

 

८.

धरण    
  क) पाणलोट क्षेत्र ३८४०.००  चौ.कि.मी.
  ख) ७५ टक्के विश्वासर्हतेची जलनिष्पती  २८३३.८३ द.ल.घ.मी
  ग) एकूण पाणी साठा. ४५३.६४ द.ल.घ.मी.
  घ) उपयुक्त पाणी साठा. ३११.३४ द.ल.घ.मी.
  च) मृत पाणी साठा. १४२.३०  द.ल.घ.मी.
  छा) धरणाची महत्त्म उंची ३१.०० मीटर
  ज) धरणाची लांबी.    
  मातीधरण, ६१४३.५० मीटर
  दगडी धरण ३४४.५० मीटर
  एकूण लांबी.  ६४८८.०० मीटर
  झ) जलोत्सारणाची लांबी.    
  लांबी २३९.०० मीटर
  क्षमता १५५०० घ.मी.प्र.सें.
  व्दारे १६  नग
  आकार १२ मी ज्र् ८ मी.
  प्रकार वक्र.  
       

 

द) महत्वाच्या पातळया. 
१) पूर्ण संचय पातळी. ४३१.८० मी.
२) कमाल जल पातळी. ४३४.८० मी.
३) धरण माथा पातळी. ४३५.६० मी.
४) किमान रिक्तन पातळी. ४२६.११ मी.

 

११. कालवे व सिंचन क्षेत्र (हे.)
पैठण उजवा कालवा लांबी वहन क्षमता सिंचनक्षमता
१३२ कि.मी. ६३.७१ घमी/से ४१६८२ (हे.)

 

जिल्हा एकूण क्षेत्र हेक्टर मशागती खालील क्षेत्र हेक्टर सिंचन क्षेत्र हेक्टर पीक क्षेत्र हेक्टर
औरंगाबाद २४८९ २२४० १७३२ १७७५
अहमदनगर २४२८ २१८६ १६९० १७३२
बीड ५४९७५ ४९४८४ ३८२६० ३९२१७
एकूण(अ) ५९८९२ ५३९१० ४१६८२ ४२७२४

 

माजलगांव उजवा कालवा. लांबी वहन क्षमता सिंचनक्षमता
१४८ कि.मी. ८२.६३ घमी/से ८४८५० (हे.)

 

जिल्हा एकूण क्षेत्र हेक्टर मशागती खालील क्षेत्र हेक्टर सिंचन क्षेत्र हेक्टर पीक क्षेत्र हेक्टर
बीड ४५११४ ४०९५६ २९१०५ २९८३३
परभणी ६८८३४ ६२४९० ४४४०८ ४५५१८
नांदेड १७५७२ १५९५३ ११३३७ ११६२०
एकूण(ब) १३१५२० ११९४०० ८४८५० ८६९७१
एकूण (अ + ब) १९१४१२ १७३३१० १२६५३२ १२९६९५

 

१२. पीक प्रमाण रचना.
प्रकार   टक्केवारी.
अ) बारमाही. १) उस. ३.०
  २) केळी व इतर. १.५
ब) खरीप. १)भात. १०.०
  २) ज्वारी. १२.०
क) रब्बी. १) गहू २५.०
  २) रब्बी ज्वारी व मका. १५.०
  ३) हरभरा. ५.०
ड) दु हंगामी. १) लांब धाग्याचा कापूस. २५.०
  २) मिरची, आले. ३.०
इ) उन्हाळी. १) भुईमग. ३.०
एकूण:   १०२.५